सीमाप्रश्नाबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.केंद्र सरकारने महाराष्ट्राची याचिका डिसमिस करा असे सांगितले आहे.केंद्र सरकारने असे सांगून देखील महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्न उकरून काढत आहे असे वक्तव्य कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मइ यांनी बेळगावात पत्रकारांशी बोलताना केले.
मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी सीमाप्रश्नाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.जल,भूमी आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यासाठी कर्नाटक सरकार कटिबद्ध आहे असेही बोम्मई म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेळगाव प्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची शिखर परिषद व्हावी भेट व्हावी कोर्टा बाहेर चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न करू असे वक्तव्य केले असताना गृहमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांना भूमिके विरोधात आडमुठी भूमिका घेतली आहे.
मंगळुरू विमान तळ बॉम्ब प्रकरणी पोलीस दलाच्या तीन विशेष पथकांनी तपास सुरू केला असून अनेक नवीन विषय तपासात समोर आले आहेत.रोजगार नसल्याच्या रागातून मानसिक विकलांग व्यक्तीने विमान तळावर बॉम्ब ठेवण्याचे कृत्य केलं आहे तो पोलिसांना शरण आला असून याचा तपास सुरू आहे असेही ते म्हणाले.