मंगळुरू विमान तळावर जीवंत बॉम्ब सापडल्याच्या पाश्वभूमीवर बेळगाव विमान तळाची देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मंगळूरु विमानतळावर जिवंत बॉम्ब सापडल्याने बेळगावात देखील हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.त्यामुळे बेळगाव विमानतळावर बॉम्ब निष्क्रिय पथकाने आतून आणि बाहेरून कसून तपासणी केली.
आजपासून स्टार एअरचे बेळगाव इंदोर विमानसेवा सुरू होणार असल्याने विमानतळाची तपासणी केली जात आहे.राज्यातील महत्वाची रेल्वे स्थानके,विमानतळे येथे अति दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.
बेळगाव विमान तळावर जवळपास दररोज 20 विमान उतरत असतात या विमान तळाच्या सुरक्षेसाठी कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा दल(ksisf) काम पहात असते.3 निरीक्षक,1 उपनिरीक्षक आणि 92 पोलीस कर्मचारी तैनात असतात या शिवाय बेळगाव पोलिसांचे सहा पोलीस देखील स्थानिक माहितीसाठी येत असतात.