अलीकडे निष्कारण सीमाप्रश्न उकरून काढला जात आहे.येथील जनतेने कोणत्याही प्रक्षोभक बाबीं कडे लक्ष न देता सामंजस्याने राहावे असे आवाहन बेळगावचे पालकमंत्री आणि अवजड,मध्यम उद्योग खात्याचे मंत्री जगदीश शेट्टर यांनी केले.
जिल्हा क्रीडांगणावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होऊन ते बोलत होते.बेळगाव आमचे .सीमाप्रश्न संपलेला आहे.बेळगाव आमचे ,कर्नाटकचा भाग असे वक्तव्य शेट्टर यांनी केले.
नागरिक सुधारणा कायदा कोणाचेही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही.हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे.यासाठी जनतेने या कायद्याला पाठिंबा द्यायला पाहिजे असेही शेट्टर म्हणाले.
देशाच्या विकासासाठी नागरिकत्व कायद्याला जनतेने पाठिंबा द्यावा देश विकसनशील करण्यास नागरिकत्व विधेयक महत्वाचे आहे असा सल्ला त्यांनी दिला.