Sunday, January 26, 2025

/

‘वृक्ष वाचवा- वृक्ष जगवा’ स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर वनखात्याची सूचना

 belgaum

बेळगावचे नूतन वर्ष 2020 हे स्मार्ट सिटी विकास कामांच्या नावाखाली कमीतकमी वृक्षतोडीचे साक्षीदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण वनखात्याने स्मार्ट सिटीच्या अभियंते आणि कंत्राटदारांना विकासाच्या नावाखाली विनाकारण वृक्षतोड न करता यांचे संवर्धन करण्याचा सल्ला दिला आहे.

‘वृक्ष वाचवा- वृक्ष जगवा’ हि काळाची गरज आहे. तेंव्हा कृपया विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करण्याची विनंती करण्यासाठी अथवा परवानगी मागण्यासाठी आमच्याकडे येऊ नका, अशी सूचना मंगळवारी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी श्रीनगर बेळगाव येथील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या विकास कामांच्या पाहणी दरम्यान केली.

कोणतीही ही विकास कामे राबविण्यापूर्वी वृक्ष संवर्धनासाठी जागा राखीव ठेवली गेलीच पाहिजे. वनखात्याने तिसरे रेल्वे गेट ते पिरनवाडी दरम्यानच्या खानापूर रोडवर त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. या ठिकाणी दर 6 मीटर अंतरावर वृक्षारोपणासाठी 2 मीटर व्यासाचे खड्डे करण्यात आले आहेत. सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले असले तरी तेथे लावण्यात येणार्‍या वृक्षांमुळे हिरवाई बरोबरच वातावरणही आरोग्यपूर्ण राहणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत विकास कामे करणाऱ्या अभियंते व कंत्राटदाराने श्रीनगर- बेळगाव येथील 69 झाडे तोडण्याची परवानगी वनखात्याकडे मागितली होती.

 belgaum
Tree forest
Tree forest

या अनुषंगाने उप वनसंरक्षणाधिकारी अमरनाथ, सहाय्यक वनसंरक्षणाधिकारी बी. एम. संगोळ्ळी, आरएफओ आर. एच. डोंबगी आणि डेप्युटी आरएफओ रमेश यांनी मंगळवारी श्रीनगरला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्या ठिकाणी हरितपट्टाच्या नावाखाली हिरवळीसाठी जमिनीचा छोटासा तुकडा मोकळा सोडण्यात आल्याचे पाहून वनाधिकाऱ्यांना धक्काच बसला.

तेंव्हा सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी संगोळ्ळी यांनी श्रीनगर येथील स्मार्ट सिटीच्या विकासकामाचे संबंधित अभियंता व कंत्राटदारांची कानउघडणी केली. तसेच तेथील रस्त्यावर दर 5 मीटर अंतरावर 2 मीटर व्यासाची जागा वृक्ष लागवडीसाठी खुली सोडण्याची सूचना दिली. तसेच वृक्ष तोड नाही तर वृक्ष लागवड हा विकास कामाचा एक भाग असल्याचेही अभियंता प्रसन्ना हेरूर यांना समजावून दिले. दरम्यान, वृक्षप्रेमी नागरिक किरण निपाणीकर यांनी वृक्ष तोडण्याऐवजी मुळापासून काढून त्यांचे अन्यत्र रोपण व संवर्धन केले जावे, असा सल्ला उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. तेंव्हा अभियंता हेरूर यांनी हा सल्ला मान्य करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.