बैलहोंगल तालुक्यातील तिगडी ग्राम पंचायत अध्यक्षाचा भीषण खून करण्यात आला आहे शुक्रवारी ही घटना घडली असून तिगडी गावातील चौघां विरोधात बैलहोंगल पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुन्ना उर्फ मकदुम हुसैनी इकबाल बहादूरसी वय 35 रा.तिगडी बैल होंगल असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.तो तिगडी ग्राम पंचायतीचा अध्यक्ष होता.
याच गावातील अर्जुनप्पा बसवानपा निलगुंद,अदृशप्पा बसवनाप्पा निलगुंद,महंतेश अर्जुनप्पा निलगुंद व निंगवा अर्जुनप्पा निलगुंद अशी संशयित आरोपींची नाव असून ते फरारी आहेत.या खून प्रकरणातील संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक स्थापन करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
शेत जमिनीत उगवलेले गवत कापण्यावरून झालेल्या वादातून विळयाने हल्ला करून हा खून करण्यात आला आहे . खून झालेला ग्राम पंचायत अध्यक्ष हा बेळगावच्या एका महिला आमदारकडे पूर्वी चालक म्हणून देखील काम केलेला होता.
बैलहोंगल पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक कुसनुर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक नियुक्त करण्यात आले आहे लवकरच आरोपींना पकडण्यात यश येईल असा विश्वास पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी व्यक्त केला आहे.