बेळगाव विमान तळा पाठोपाठ बेळगाव रेल्वे स्टेशनला देखील अच्छे दिन आलेत असेच म्हणावे लागणार आहे कारण बेळगाव विमान तळावरून दररोज उडणाऱ्या विमानांची संख्या 20 पर्यंत पोहोचली असताना बेळगाव रेल्वे स्टेशनहुन बंगळुरू विशेष ट्रेन सोडल्या नंतर आता बेळगाव पुणे दरम्यान देखील आगामी 9 फेब्रुवारी पासून जनशताब्दी धावणार आहे.
रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातुन बेळगाव पुणे दरम्यान जन शताब्दी धावणार आहे याचा फायदा बेळगाव जिल्ह्यासह सांगली मिरज भागांतील प्रवाश्यांना देखील होणार आहे.बेळगावातील स्थानिक वर्तमानपत्रानी दिलेल्या बातमीनुसार 9 फेब्रुवारी पासून बेळगाव पुणे दरम्यान ही ट्रेन धावणार असून पुणे येथून सकाळी 6 तर दुपारी 2 वाजता बेळगावला पोहोचणार आहे.
![Jan shatabdi](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/01/jan-shatbdi.jpg)
बेळगाव ते पुणे 416 की मी अंतर सदर ट्रेन 70 की मी प्रति तास वेगाने धावणार आहे.या गाडीला 20 डबे असणार असून पूर्ण ट्रेन वातानुकूलित असेल त्यात ए सी चेअर कार, एकझुकेटीव्ह चेअर कार,सेकंड सिटिंग असणार आहे.शताब्दी पेक्षा स्वस्त जनशताब्दी आहे.
A GOOD MOVE TO RUN THE TRAIN BETWEEN PUNE AND BELGAUM
CONGRATULATIONS