येत्या जूनपर्यंत सुसज्ज करा सीबीटी बसस्थानक:

0
265
Savadi shwarappa
Savadi shwarappa
 belgaum

बहुचर्चित बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकच्या (सीबीटी) अधुनिकीकरणाचे काम कोणत्याही परिस्थितीत येत्या जून 2020 पर्यंत पूर्ण झाले पाहिजे अशी कडक सूचना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी संबंधित कंत्राटदाराला दिली.

बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक (सीबीटी) येथे 9 मल्टी एक्सल बसगाड्यांचे उद्घाटन सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या हस्ते विधीवत पूजन व श्रीफळ वाढविण्याद्वारे झाले. त्यानंतर सीबीटी बसस्थानक नूतनीकरणाचे काम हाती घेतलेल्या कंत्राटदाराशी बोलताना उपमुख्यमंत्री सवदी यांनी सीबीटी बसस्थानकाचे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण करण्याची कडक सूचना केली.

Savadi shwarappa
Savadi shwarappa

नव्या मल्टीएक्सल बस गाड्यांच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी, चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले,  आदी मान्यवर उपस्थित होते.

 belgaum

सदर उद्घाटन समारंभानंतर उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवर नव्या मल्टीएक्सेल बसमधून सुवर्ण विधान सौध येथे आयोजित बायो- फ्युअल वर्कशॉपला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.