बेळगाव विमानतळावर आज शुक्रवार दि. 17 जानेवारी 2020 रोजी या मोसमातील राज्यातील विमानतळाच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे 11.2 डिग्री सेल्सिअस इतक्या तपमानाची नोंद झाली आहे. हे तापमान सर्वसामान्य तापमानापेक्षा -3 डिग्री सेल्सियस (मायनस थ्री डिग्री) कमी आहे.
बेळगाव विमानतळावर या मोसमातील सर्वाधिक तापमान 29.2 डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. त्याचप्रमाणे या विमानतळावरील सर्वाधिक कमी तापमान गेल्या 22 जानेवारी 1984 रोजी 6.4 डिग्री सेल्सिअस इतके नोंद झाले होते तर सर्वाधिक 47 डिग्री सेल्सिअस तापमान 2010 साली नोंदविले गेले होते
विमानतळांच्या दृष्टिकोनातून कर्नाटकच्या किनारपट्टीचा प्रदेश आणि दक्षिण कर्नाटकचा अंतर्गत भागातील काही ठराविक प्रदेशासह उत्तर कर्नाटकाच्या अंतर्गत भागातील कांही भागांमध्ये सर्वसाधारण तापमानापेक्षा कमी तापमान (वजा 3.1 डिग्री सेल्सियस ते वजा 5.0 डिग्री सेल्सिअस) चालू शकते.
दरम्यान, बेळगाव शहर परिसरात आज शुक्रवारी पहाटे थंडीचा कडाका होता. दिवसभर शहर परिसरात गारवा जाणवत होता.