Wednesday, May 1, 2024

/

बेळगावात साकारणार केंद्राचे भव्य टेक्नॉलॉजी सेंटर?

 belgaum

केंद्र सरकारतर्फे बेळगाव येथे ‘टेक्नॉलॉजी सेंटर’ हा सुमारे 200 ते 300 कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याची जमीन निश्चित करण्यासाठी एमएसएमई विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी बेळगावला भेट देऊन पाहणी केली. सदर टेक्नॉलॉजी सेंटरसाठी राज्य सरकारकडून 20 एकर जमीन मिळणे आवश्यक आहे.

या नियोजित टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये कौशल्य विकास केंद्र, किमान 1000 विद्यार्थ्यांसाठी निवासी औद्योगिक प्रशिक्षण शाळा / कॉलेज, इंक्युबॅशन सेंटर, टूल रूम, बेळगाव जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर एमएसएमई अधिक बळकट करण्यासाठी सर्व औद्योगिक केंद्रांच्या कामांचे उपकंत्राट मिळवण्यासाठी आवश्यक ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग सुविधा आदींचा समावेश असणार आहे. या भव्य टेक्नॉलॉजी सेंटरसाठी सुमारे 200 ते 300 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.

राज्य सरकारने केंद्राच्या या टेक्नॉलॉजी सेंटर प्रकल्पासाठी कित्तूर इंडस्ट्रियल इस्टेट येथे 20 एकर जागा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तथापि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रोहन जुवळी यांनी सदर टेक्नॉलॉजी सेंटर उद्यमबाग, मच्छे, नावगे या परिसरानजीक झाले तर त्याचा येथील औद्योगिक क्षेत्राला आणि विद्यार्थ्यांना कसा मोठा फायदा होईल हे भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील ‘एमएसएमई’चे संचालक आणि क्लस्टर डेव्हलपमेंट सर्व्हेअर मेजर सिंग यांना पटवून दिले. तसेच बेळगावात 3 इंजिनीरिंग कॉलेज, 4 आयटीआय कॉलेज आणि एक टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी असल्याचेही जुवळी यांनी सिंग यांच्या निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी उपाध्यक्ष महादेव चौगुले, व्यवस्थापन समितीचे सदस्य वैभव यादव आदी उपस्थित होते.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.