स्मार्ट सिटी योजने अंतर्गत 76.80 कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरचा लोकार्पण कार्यक्रम मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्या हस्ते पार पडला.या बरोबरच अशोक नगरमधील जलतरण तलाव,व्यायामशाळा,इंग्रजी शाळा आणि एका कार्यालयाचे देखील येडीयुरप्पा यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
![Cantrol command centre smart city](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/01/IMG-20200129-WA0393.jpg)
प्रारंभी स्मार्ट सिटीचे एम डी शशीधर कुरेर यांनी कमांड अँड कंट्रोल सेंटरची माहिती दिली.नंतर सेंटरच्या कामकाजाचे प्रात्यक्षिक दाखवले.स्मार्ट सिटी योजनेमुळे शहराचा विकास होणार आहे असे येडीयुरप्पा म्हणाले.
बेळगाव शहरातील रहदारी सिग्नल्स,कामे, स्ट्रीट लाईट आदींचे नियंत्रण या कक्षातून केले जाणार आहे
यावेळी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी,खासदार डॉ प्रभाकर कोरे,उप मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी ,महिला बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले,खासदार अण्णा साहेब जोल्ले,आमदार अभय पाटील,अनिल बेनके,महानतेश कवटगिमठ, दुर्योधन ऐहोले,शंकरगौडा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.