दक्षिण कन्नडा असोसिएशन ऑफ बॉडीबिल्डर्स या संघटनेतर्फे म्हैसूर येथे अलीकडेच आयोजित ‘मिस्टर वज्रदेही’ किताबाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगावचा शरीरसौष्ठवपटू विकास सूर्यवंशी याने स्पृहणीय यश संपादन करताना 85 किलोवरील गटात प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच बेळगावच्या उमेश गानगणे, करण देसुरकर, केदार पाटील व आफ्रोज तहसीलदार यांनीही आपापल्या गटात उल्लेखनीय यश मिळवले.
दक्षिण कन्नडा असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स या संघटनेतर्फे म्हैसूर येथे अलीकडेच आयोजित राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील ‘मिस्टर वज्रदेही’ किताब बेंगलोरच्या कुमार के. याने हस्तगत केला. कुमार के. मागोमाग टायटल फर्स्ट रनर्सअप् नित्यानंद कोटीयान (उडपी) आणि सेकंड रनर्सअप् विकास सूर्यवंशी (बेळगाव) हे ठरले. म्हैसूर येथे झालेल्या मिस्टर वज्रदेही शरीरसौष्ठव स्पर्धेत विविध वजनी गटांचा अंतिम निकाल खालील प्रमाणे आहे.
55 किलो वजनी गट: 1) शशीधर (उडपी), 2) के. सलीम बाशा (बेळ्ळारी), 3) सईद फेक्सील (चित्रदुर्ग), 4) आकाश रावळ (बेळगाव), 5) राजकुमार दुरगुडे (बेळगाव). 60 किलो वजनी गट:1) अभिलाष (उडपी), 2) उमेश गणगणे (बेळगाव),3) अविनाश मंतोरी (धारवाड), 4) नीलेश मोहिते (बेळगाव). 65 किलो वजनी गट: 1) सचिन अमीन (दक्षिण कन्नडा), 2) सर्वनण एच. (बेंगलोर), 3) केशव पाटील (बेळगाव), 4) किशोर नाईक (धारवाड), 5) विशाल शहापूरकर (बेळगाव). 75 किलो वजनी गट: 1) विराज (दक्षिण कन्नडा), 2) अश्वत सुजन (दक्षिण कन्नडा), 3) आफ्रोज तहसीलदार (बेळगाव). 80 किलो वजनी गट: 1) कुमार के. (बेंगलोर), 2) चेतन कोटीयान (उडपी), 3) करण देसुरकर (बेळगाव), 4) गजानन काकतीकर (बेळगाव). 85 किलो वजनी गट: 1)नित्यानंद कोटीयान (उडपी), 2) जहर (उडपी), 3) बेनव्हीन (दक्षिण कन्नडा).85 किलोवरील वजनी गट: 1) विकास सूर्यवंशी बेळगाव 2) मोहम्मद निरुल्ला (चित्रदुर्ग), 3) अन्वित शेट्टी (दक्षिण कन्नडा), 4)रितेश डिसोजा (दक्षिण कन्नडा), 5)रोहित चव्हाण (बेळगाव).