गोवा येथील 71 व्या प्रजासत्ताक दिन संचलनात बेळगावच्या केएसआरपी महिला प्लाटूनने सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली.
गोवा येथे राज्यपाल श्री सत्यपाल मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना गोवा येथील कर्नाटक राज्य पोलीस दलाचे समन्वय अधिकारी आणि बेळगावच्या केएसआरपी सेकंड बटालियनचे कमांडंट हमजा हुसेन यांनी हस्तांदोलन करून आपला परिचय दिला.
![Belgaum women police](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/01/IMG-20200126-WA0721.jpg)
याप्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, पोलीस उपमहानिरीक्षक राकेशकुमार, रमेश बोरगावे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. यावेळी गोवा पोलीस, सशस्त्र पोलीस दल, निमलष्करी दल, राष्ट्रीय छात्र सेना आदींच्या पथकांनी वाद्यवृंदाच्या तालावर पथसंचलनातद्वारे राज्यपालांना मानवंदना दिली. या पथसंचलनात बेळगावच्या कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या (केएसआरपी) महिला प्लाटूनचा देखील सहभाग होता. आपल्या शिस्तबद्ध पथसंचलनातद्वारे या प्लाटूनने उपस्थितांची वाहव्वा मिळविली.