बेळगाव शहरातील दक्षिण भागांत अग्रगण्य असलेली बँक मानली जाणारी तुकाराम बँकेची निवडणूक 2020 ते 2025 साला करिता बिन विरोध झाली आहे.यावेळी बँकेत संचालक म्हणून संजय बाळेकुंद्री आणि पल्लवी सरनोबत हे नवीन चेहरे नियुक्त झाले आहेत तर उर्वरित सर्वच संचालक मंडळ जुने आहे.
रिजर्व बँकेच्या नियमानुसार तुकाराम बँकेत 128 जणांना मतदानाचा हक्क होता त्यापैकी खालील जणांनी संचालक पदासाठी अर्ज केले होते.अतिरिक्त इच्छुकांनी माघार घेतल्याने निवडणूक बिन विरोध झाली आहे.
खालील प्रमाणे तुकाराम बँकेच्या संचालक मंडळाची बिन विरोध निवड झाली आहे.
प्रकाश मरगाळे ,प्रदीप ओउळकर,नारायण पाटील ,अनंत जांगळे,मदन बामणे,राजू मरवे
प्रवीण जाधव,मोहन कंग्राळकर,विजय पाटील
पल्लवी सरनोबत ,वंदना धामणेकर हे सर्व सामान्य तर संजय बाळेकुंद्री ओबीसी
राजेंद्र पवार(एस सी) हे संचालक मंडळात आहेत.