बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्या तील गटतट संपवा.गटतट जोपर्यंत संपवत नाही तोपर्यंत तुमच्या लढ्याला अर्थ नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हंटले आहेत.केव्हाही हाक मारा मी हजर आहे असे दिलासा देणारे उदगार राज्यसभा सदस्य दैनिक सामना संपादक संजय राऊत यांनी काढले.
बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं आयोजित बॅ नाथ पै व्याख्यानमला उदघाटन समारंभ प्रसंगी प्रकट मुलाखतीत बोलत होते.
आपल्या मुलाखतीत त्यांनी सीमाप्रश्नाचा देखील उहापोह केला.सध्या सीमाप्रश्न न्यायालयात आहे.लढा उत्तम प्रकारे लढायला पाहिजे.टोकाचा संघर्ष न करता मराठी भाषा,संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.कोणतीही भाषा,संस्कृती टिकवणे ही प्रत्येक राज्याची जबाबदारी आहे.भाषेला शत्रू न मानता त्याचा विकास करण्याचा पप्रयत्न केला पाहिजे.सीमाभागात एकोपा राहिलाय का असा सवालही संजय राऊत यांनी केला.
सरकार चालवण्यासाठी धर्माचा आधार घेऊ नये.धर्माचा आधार घेतला तर हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला,इराण व्हायला वेळ लागणार नाही. आमचं हिंदुत्व गाडगे महाराजांचं आहे.तहानलेल्या पाणी,भुकेल्याला अन्न आणि हवा असलेल्याला निवारा हे आमचं हिंदुत्व गाडगे महाराजांचे आहे.आणि ते आम्ही पुढे घेऊन चाललोय.मुसलमानांनी मुसलमान म्हणून न जगता या देशाचे नागरिक म्हणून जगावे असे परखड विचार ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये राजकीय मतभेद आहेत. मात्र त्यांच्यातील कौटुंबिक नातं अजूनही कायम आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. बेळगावातील गोगटे रंगमंदिरमध्ये झालेल्या प्रकट मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नात्यावर बोलताना ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, बेळगावात मराठी भाषेची मशाल पेटली आहे. देशामध्ये भाषे-भाषेचा वाद असू नये. याठिकाणी भाषेचा आणि संस्कृतीचा वाद आहे. मात्र न्यायालयाच्या मार्गाने यावर निर्णय होईले, असे देखील त्यांनी सांगितले.
सार्वजनिक वाचनालयातर्फे पत्रकार पुरस्कार वितरण उत्साहात
सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित 45 व्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेचे उद्घाटन आणि पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा कॅम्प येथील गोगटे रंगमंदिर (स्कूल ऑफ कल्चर) येथे शनिवारी सायंकाळी उत्साहात पार पडला.
सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष माजी महापौर गोविंद राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते व सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत आणि प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी उपस्थित होते. व्यासपीठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष कृष्णा शहापूरकर, कार्यवाह नेताजी जाधव, सहकार्यवाह अॅड. आय. डी. मुचंडी, प्रा आनंद मेणसे, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कोठेकर आदी हजर होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर खासदार संजय राऊत व स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते श्री सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे आणि व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले.
सदर सोहळ्यात खासदार संजय राऊत यांच्या हस्ते सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणाऱा पत्रकार पुरस्कार मराठी विभागासाठी तरुण भारतचे वार्ताहर एन. ओ. चौगुले यांना तर कानडी विभागात कन्नड प्रभातचे वार्ताहर सी. ए. इटनाळमठ यांना प्रदान करण्यात आला. तसेच स. रा. जोग महिला पुरस्कार वेणू ध्वनीच्या निवेदिका मनीषा सरनाईक व कन्नड विभागासाठी दैनिक विजयवाणीच्या जयश्री अब्बिगेरी यांना देण्यात आला. रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सदर उद्घाटन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यास वाचनालयाचे सदस्य अभय याळगी, अनंत जाधव, तळेकर, अनंत जांगळे, सुनीता मोहिते आदींसह निमंत्रित मंडळी व बहुसंख्य श्रोते उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन वाचनालयाचे कार्यवाह नेताजी जाधव यांनी केले.
प्रारंभी कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविक केले.वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद राऊत यांनी स्वागत केले.नेताजी जाधव यांनी सूत्रसंचालन केले.ईश्वर मुचंडी यांनी आभार मानले.