Sunday, December 22, 2024

/

स्वच्छ सर्वेक्षण लिग बेळगाव 277 व्या स्थानावर कायम, तर राज्यात 9 वे

 belgaum

भारत सरकारच्या केंद्रीय गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वार्षिक शहरी स्वच्छता सर्वेक्षणाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण लिग- 2020’ (तिमाही-1आणि तिमाहीत- 2) या पाचव्या आवृत्तीला येत्या 4 जानेवारी 2020 रोजी प्रारंभ होणार आहे. दरम्यान 2019 चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये बेळगाव शहराने देशातील आपले 277 वे स्थान कायम राखले आहे.

केंद्रीय गृह आणि शहरी व्यवहार खात्याचे मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी गुरुवारी हा निकाल जाहीर केला आहे. गेल्यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये बेळगाव शहराने राष्ट्रीय पातळीवर देशातील 425 शहरांमधून 277 वा क्रमांक आणि कर्नाटक राज्यात 26 शहरांमधून 9 वा क्रमांक पटकाविला आहे . तत्पूर्वी 2018 मध्ये बेळगाव देशात 268 व्या तर राज्यात 14 व्या क्रमांकावर होते. स्वच्छतेच्या बाबतीत देशातील शहरांनी सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी बजावावी या उद्देशाने स्वच्छ सर्वेक्षण लीग 2020 (एसएस 2020) अंमलात आणले गेले आहे. एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते डिसेंबर 2019 अशा तीन तिमाही कालावधीमध्ये एसएस लीगचे आयोजन करण्यात आले होते. या लीगसाठी प्रत्येक तिमाहीला 2000 गुण निश्चित करण्यात आले होते. शहर स्वच्छतेसंदर्भात गुण देण्यासाठी विविध निकष ठरविण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक शहराचे दरमहा एसबीएम- यू ऑनलाइन एमआयएस मध्ये सातत्यपूर्ण सुधारणा, आउट बॉंड कॉल्सद्वारे विविध 12 सेवास्तरिय नागरिकत्व मूल्यांकन आदींचा समावेश आहे.

Swachh-Surveksha-218x150
Swachh-Surveksha-

स्वच्छ शहरांचे मानांकन देण्यासाठी दोन विभाग करण्यात आले आहेत. पहिल्या विभागांमध्ये एक लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे (यामध्ये दोन उपविभाग ते म्हणजे 1 ते 10 लाख लोकसंख्या पहिला उपविभाग आणि 10 लाख आणि त्यावरील लोकसंख्‍या दुसऱ्या उपविभाग) तसेच दुसऱ्या विभागांमध्ये एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान येत्या 4 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देशातील नागरिकांचा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांच्या हितासाठीच हे स्वच्छ सर्वेक्षण असल्यामुळे त्यांनी आपापल्या शहरातील स्वच्छते संदर्भातील कामांचा पाठपुरावा करावा तसेच त्यासंबंधीची माहिती 1969 स्वच्छता हेल्पलाइन (1969), द स्वच्छता ॲप, स्वच्छ सर्वेक्षण 2020 पोर्टल, आऊट अबाउट कॉल्स अथवा हॉट फॉर युवर सिटी ॲप येथे 4 जानेवारी 2020 पासून नोंदवण्यास सुरुवात करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.