सार्वजनिक जागेवर असलेली बेकायदेशीर मंदिरे,चर्च, मशीद आणि गुरुद्वारा त्वरित हटवून त्या संबंधी 31 जानेवारी पूर्वी अहवाल सादर करावा असा आदेश जिल्हाधिकारी एस.बी.बोमनहळ्ळी यांनी पत्रकाद्वारे बजावला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 29 सप्टेंबर 2009 मध्ये देशातील सगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एका आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या मंदिरे,चर्च,मशीद,गुरुद्वारा उभारली जावू नयेत असा आदेश बजावला होता.
अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून सार्वजनिक जागेवर उभारण्यात आलेली मंदिरे,मशीद,चर्च ,गुरुद्वारा हटवावित.कारवाईसाठी अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त घ्यावा असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.