बेळगाव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शनिवारी किमान तापमान 14 अंश यावर गेले होते. तर कमाल तापमान तीस अंशावर होते. मात्र रविवारी हा आकडा मोडीत काढून निच्चांकी थंडीने आकडा गेल्याचे दिसून आले.रविवारी सकाळी सात वाजता बेळगावचा पारा सात अंशावर गेल्याची नोंद हवामान खात्याकडून मिळाली आहे. त्यामुळे मागील काही वर्षाच्या तुलनेत ही थंडी निच्चांकी ठरली आहे.
बेळगावचा किमान पारा 7 अंशावर तर कमाल 19 अंशापर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे थंडीत मोठी वाढ झाली असून वाऱ्याची दिशाही बदलली आहे. सकाळपासूनच ढगाळ हवामान व धुक्याने नागरिकांना हैराण करून सोडले होते. अजूनही या थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात अनेक ठिकाणी हा पारा अजूनही कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सध्या उत्तरेत थंडी असून उत्तर आणि पश्चिमी वारे आणि राज्यात बहुतांश ठिकाणी असलेले कोरडे हवामान यामुळे राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात वाऱ्याची दिशा बदलून दक्षिण-पूर्व होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेळगाव आणि परिसरात व उत्तर कर्नाटकात किमान तापमान काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता अजूनही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या थंडीत आणखी वाढ होऊन नागरिकांना याचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
किनारपट्टीवरील तापमान सध्या 20 अंशापर्यंत आहे. शनिवारी बेळगावचा पारा 14 नुसार होता. मात्र रविवारी तो तब्बल अर्ध्यापटीने कमी होऊन सात अंशावर आला आहे. चित्र दहा ते पंधरा वर्षांपर्यंत हा पारा गेला आहे. त्यामुळे यावर्षी तील सर्वात कमी नीचांक असलेली ही आकडेवारी अजूनही कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नोव्हेंबर उलटला तरी थंडी नसल्याने अनेक आतून समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र डिसेंबरच्या आणि जानेवारीच्या सुरुवातीला थंडीने मोठ्या प्रमाणात प्रभाव सुरू केला आहे. अशा परिस्थितीत अनेकांना आता उबदार कपड्यांचा आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे आता थंडी आणखी वाढली तर पुन्हा गारठून जाण्याची शक्यता आहे. सध्या हवामानात बदल झाला असून कोरडे हवामान पडले आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण ही दिसू लागले आहे. अशा परिस्थितीत थंडीने मोठ्या प्रमाणात वाढल्याने या पुढे कसे होणार अशीच भीती साऱ्यांना लागून राहिली आहे.