सांबरा विमानतळाचे अवकाश होणार आता हवाई वाहतुकीने व्यस्त

0
795
Belgaum air port
Belgaum air port bldg
 belgaum

प्रादेशिक संपर्क योजना ‘उडान’ने देशातील हवाई वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात केली असून त्याचा फायदा बेळगाव विमानतळालाही झाला आहे. स्टार एअर कंपनीने आपल्या विमान सेवेद्वारे बेळगावला इंदोरशी जोडले आहे. आता बेळगावहून आणखी 8 ठिकाणी हवाई वाहतूक सुरू झाली असल्यामुळे सांबरा विमानतळाचे अवकाश यापुढे हवाई वाहतुकीने व्यस्त दिसणार आहे.

एकेकाळी पाच वरून शून्य विमानसेवा अशी बेळगाव सांबरा विमानतळाची अवस्था होती. मात्र आता सांबरा विमानतळ नव्या दमाने उभारी घेत असून येथून देशाच्या विविध भागात विमान सेवा सुरू झाल्या आहेत. स्टार एअर कंपनीने आपली बेळगाव ते इंदोर (मध्यप्रदेश) ही विमान सेवा आज सोमवारपासून सुरू केली आहे. आठवड्यातून तीन दिवस ही सेवा उपलब्ध असणार आहे.

स्टार एअर कंपनीच्या या विमान सेवेमुळे आता बेळगावहून रोज 8 उड्डाणे होणार असून आठ शहरे बेळगावशी जोडली गेली आहेत. त्यामध्ये बेंगलोर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, तिरुपती, म्हैसूर आणि इंदोर या शहरांचा समावेश आहे. यापैकी बेंगलोरसाठी 4 विमानफेऱ्या हैदराबादसाठी 3, मुंबईला 2 तसेच पुणे, इंदोर, तिरुपती, म्हैसूर आणि अहमदाबाद या ठिकाणी प्रत्येकी 1 विमान फेरी असणार आहे.

 belgaum

विद्यार्थी, पर्यटक आणि उद्योजकांच्या मागणीमुळे स्टार एअरने बेळगावहून इंदोरला विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ही सेवा सोमवार, मंगळवार आणि गुरुवार असे आठवड्यातून तीन दिवस उपलब्ध असणार आहे. या दिवशी दुपारी 1.10 वाजता हे विमान बेळगावहून निघणार असून ते दुपारी 2.40 वाजता इंदोरला पोहोचणार आहे. त्यानंतर परतीच्या प्रवासात हे विमान दुपारी 3.10 वाजता निघून बेळगाव येथे सायंकाळी 4.45 वाजता पोहोचणार आहे.

बेळगावच्या सांबरा विमानतळावरून आता रोज 12 विमानांचे आगमन आणि 12 विमानांचे प्रस्थान होणार आहे. याचे औपचारिक उद्घाटन सोमवारी दुपारी सांबरा विमानतळावर झाले. विमानात सेवांच्या वाढत्या आलेखामुळे रीजनल कनेक्‍टिव्हिटी स्कीम ‘उडान’ अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या देशव्यापी विमानतळांपैकी सर्वाधिक व्यस्त पांच विमानतळांमध्ये बेळगाव आणि हुबळी विमानतळाची वर्णी लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.