अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा रब्बी पेरणी हंगाम पुढे गेला असून त्यात ढगाळ वातावरणाने उगवण झालेल्या रब्बी पीकांवर अतोनात जिग्गी,किड,मर रोग पडली आहे. शेतकरी पीकांवर औषध फवारणी साठी औषध स्वस्त मिळतात म्हणून औषधं घ्यायला शिवाजी नगरमधील कृषी खात्यातील कार्यालयात गेले असता त्यांना हात हलवत परत याव लागल आहे.
कृषी खात्याने ती औषध सोमवार नंतर मिळतील असे तेथील अधिकारी, कर्मचारी सांगून शेतकऱ्यांना परत पाठवत आहेत.येळ्ळूर, धामणे,मच्छे, मजगाव,शहापूर,वडगाव,जूनेबेळगाव तसेच इतर परिसरातील शेतकरी पीकं रोगावर नियंत्रण आणण्यासाठी औषध फवारतात.
पण ती आता सोमवार नंतर औषध मिळतील म्हणून सांगितल्यावर नाराज होत बाजारातील अवाच्यासव्वा किम्मत देऊन औषध घ्यावीच लागतात.कारण सोमवार पर्यंत वाट पाहिल्यास असलेले पीकही किड,मर,जिगिने नायनाट होईल याच चितेंने ग्रासले आहेत.
यामुळे वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पीकावरील रोगांचा गांभीर्याने विचार करुन ताबडतोब कृषी खात्यात औषधे उपलब्ध करावीत आणि बेळगाव शहर मध्यभागात कृषी कार्यालय करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.