शहरातील वाढत्या पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यात येणार असून मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात चार चाकी वाहनांना प्रवेश बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे.या बरोबरच किल्ल्या जवळ असलेल्या आयकर खात्याच्या जागेत पार्किंग झोन करण्यात येणार आहे.
आयकर खात्याला त्याबद्दल पर्यायी जागा देण्यात येणार आहे.चार चाकी वाहने तेथे पार्क केली जाणार असून तेथून बाजारपेठेत जाण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था स्मार्ट सिटी योजने अंतर्गत केली जाणार आहे.
यासाठी पन्नास बॅटरीवर चालणारे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यात येणार असून वाहन पार्क करणाऱ्या ना तेथून बाजारपेठेत सोडण्यात येणार आहे.या योजनेला जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रीन सिग्नल देणे शिल्लक आहे.