71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त टिळकवाडी येथील श्री बलराम स्पोर्ट्स क्लबतर्फे रविवारी दुपारी आयोजित 28 व्या श्री बलराम स्पोर्ट्स क्लब क्रॉस कंट्री मिनी मॅरेथॉन शर्यतीतील खुल्या पुरुष व महिला गटाचे विजेतेपद अनुक्रमे अरुण गवळी आणि शिल्पा होसमनी यांनी हस्तगत केले. त्याचप्रमाणे भरतेश राजगोळकर, संचिता पाटील, भुवन पुजारी, समर्थ कदम, वैष्णवी कामाण्णाचे व सुरेश देवमनी यांनी आपापल्या गटाचे जेतेपद मिळविले.
दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनी रविवारी राष्ट्रीय एकात्मता, शांतता व जातीय सलोखा यांचा संदेश देण्यासाठी या क्रॉसकंट्री शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. गोवावेस येथील श्री पंचवटी मंदिरासमोर प्रमुख पाहुणे सुभाष नाईक यांच्या हस्ते हे सदर शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले. खुल्या पुरुष व महिला गटासाठी गोवावेस पंचवटी मंदिरापासून श्री बसवेश्वर सर्कल, रेल्वे ओव्हर ब्रिज, गोगटे सर्कल, काँग्रेस रोड, पहिले रेल्वे गेट, शुक्रवार पेठमार्गे पुन्हा श्री पंचवटी मंदिर असा शर्यतीचा मार्ग होता. शर्यतीचा बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुणे वयस्क धावपटू यशवंत कामाण्णाचे, श्री बलराम स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अॅड. धनराज गवळी जी. बी. पाटील, सुभाष नाईक, अॅड. श्रीकांत पवार, राजू चव्हाण, सुजाता गवळी आदींच्या हस्ते पार पडला. शेवटी शर्यतीचे संयोजक प्रमुख रोहन गवळी यांनी मिठाईचे वाटप करून आभार प्रदर्शन केले.
ही क्रॉसकंट्री शर्यत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रोहन गवळी यांच्या नेतृत्वाखाली निखील मोरे, राहुल चव्हाण, राहुल गवळी, अंकुश गवळी, अविनाश गवळी, अमोल कुंडेकर, विश्वनाथ, सागर सांबरेकर, कृष्णा गवळी, सागर गवळी, भारत चौधरी, गौतम गवळी, राजू वर्पे, किरण गवळी, रमेश गवळी, पवन चौधरी, राकेश गवळी, प्रकाश भवानी, राजू भवानी, राजू गवळी, राजेश गवळी, मोहन गवळी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
श्री बलराम स्पोर्ट्स क्लब क्रॉसकंट्री शर्यतीचा गटवार अंतिम निकाल पुढील प्रमाणे आहे. पुरुष खुला गट : 1) अरुण माळवी, 2) रामकृष्ण नाईक, 3) परशराम कुणकी, 4) सुरज मेणशी, 5) लक्ष्मण बडीगेर. महिला खुला गट : 1) शिल्पा होसमनी, 2) समीक्षा पाटील, 3) अस्मिता कलमण्णावर, 4) वैष्णवी भवानी, 5) नंदिनी भवानी. इयत्ता 8 वी ते 10 वी मुलांचा गट : 1) भरतेश राजगोळकर, 2) निखिल पाटील, 3) वासुदेव सावंत, 4) सुनील बेळगावकर, 5) चेतन कोलकार. मुलींचा गट : 1) संचिता पाटील, 2) अर्चना बागुटकर, 3) संपदा चौगुले, 4) सयामी कुसण्णावर, 5) वैभवी पाटील.
इयत्ता 5 वी ते 7 वी मुलांचा गट : 1) भुवन पुजारी, 2) आलोककुमार यड्डलगुड्ड, 3) संदीप चौगुले, 4) प्रेम बुरूड, 5) साईश कदम. मुलींचा गट : 1) शिल्पा होसमनी , 2) साईश्री पाटील, 3) प्रेरणा बनचमर्डी, 4) समृद्धी बिर्जे, 5) माणसा बेनचीमर्डी. इयत्ता 4 थी पर्यंतचा मुलांचा गट : 1) समर्थ कदम, 2) यल्लाप्पा बेळगावकर, 3) बाळकृष्ण कुणगी, 4) मनोज पाटील, 5) ज्योतिबा बेळगावकर. मुलींचा गट : 1) वैष्णवी कामाण्णाचे, 2) स्वाती होसमनी, 3) दिशा राजू वरपे, 4) गायत्री पवार, 5) तन्वी कारेकर. वयस्कर गट : 1) सुरेश देवरमनी, 2) धोंडीराम शिंदे, 3) मारुती कणबरकर, 4) यशवंत कामाण्णाचे, 5) तन्मय नाईक.