ए पी एम सी व्होलसेल भाजी मार्केट मध्ये व्यापाऱ्यांनी रिटेल भाजी विक्री करू नये अशी मागणी शहरात रस्त्या शेजारी किरकोळ भाजी विक्रेत्या महिलांनी केली आहे.
बुधवारी सकाळी ए पी एम सी सेक्रेटरी डॉ कुरी गौडा यांना भेटून त्यांनी ही मागणी केली आहे. ए पी एम सी च्या व्होलसेल भाजी मार्केट मध्ये किरकोळ भाजी विक्री करायला परवानगी देऊ नये व्होलसेल मध्ये रिटेल विक्रीचा फटका आम्हाला बसत आहे अशी देखील त्यांनी विनंती केली आहे.
सध्या एक किलो दोन किलो अशी एपीएमसी व्होलसेल भाजी मार्केट मध्ये विक्री सुरू आहे याचा फटका शहरात किरकोळ विक्री करणाऱ्या वर होत आहे यापूर्वी किल्ला भाजी मार्केट मध्ये असे होत नव्हते असे देखील त्या भाजी विक्रेत्या महिलांनी म्हटले आहे.
ए पी एम सी सचिवांनी सदर महिलांना ए पी एम सी मध्ये विक्री साठी जागा उपलब्ध करून देऊ रस्त्याएवजी तुम्ही मार्केट यार्डात या असे सांगितले त्यावर मनपाने रस्त्यावर भाजी विक्री करीत रीतसर परवाने दिले आहेत शहरात विविध ठिकाणी बसून भाजी विक्री करतो त्यामुळे एकाच बसून विकणे सोयीचे होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावर ए पी एम सी अध्यक्षाना सांगून किरकोळ भाजी विक्री बंद करू असे आश्वासन या महिलांना मिळाले.