आंबेवाडीची कन्येने फॉरेस्ट परिक्षेत बेळगाव तालुक्यातील आंबेवाडीच्या कन्येने झेंडा रोवला असून यश संपादन केल आहे.प्रियांका तरळे हिने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे तिची निवड स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस साठी झाली आहे.
गेल्या 1 डिसेंम्बर पासून हिमाचल प्रदेश मध्ये ट्रेनिंग घेत आहे प्रियांका हिने या अगोदर के पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाली होती
प्रियांका हिचे दहावी पर्यंतचे शिक्षण सेंट जोसेफ मध्ये झाले होते 98 टक्के गुण मिळवत तिने जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवला होता.आर एल एस कॉलेज मध्ये पी यु सी शिक्षण झाले होते सायन्स मध्ये 99.5% गुण मिळवले होते त्या नंतर तिने बी ई ही पदवी विशेष प्रावीण्यसह मिळवली होती.
या नंतर तिने प्रशासकीय परीक्षा देत के पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाली के पी एस सी पहिल्यांच प्रयत्नात उत्तीर्ण झाली असून तिची निवड फॉरेस्ट(वन खात्यात) झाली आहे.हिमाचल मध्ये ती प्रशिक्षण घेत आहे.प्रियांका ही हिंडलगा शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र तरळे यांची कन्या आहे