इर्टीका कारने ऊसवाहू ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा सुवर्ण सौध जवळ हा अपघात घडला आहे.
कार चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून जोराने ऊस वाहू ट्रॅक्टरला धडक दिली त्यात हावेरी येथील युवक बडेसाब वय 28 वर्षे याचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे तर कार मधील अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळी हिरे बागेवाडी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.कार चालकाचे इरटीका वरील नियंत्रण सुटल्याने ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅककटर जोराची धडक दिली कार भरधाव वेगाने ऊस वाहू गाडीवरधडकली आहे कारचा समोरील भाग पूर्ण पणे खराब झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हावेरीचे मित्र हुबळी मध्ये कपडे खरेदी करायला आले होते कपडे खरेदी आटोपुन ते बेळगावला जेवणासाठी येत होते त्यावेळी सुवर्ण सौध जवळ अति वेगात असताना चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.
शुक्रवारी रात्री अपघात पहाण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती दोघा जखमींवर बेळगावातील खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.