Monday, January 6, 2025

/

कबनाळी परिसरात वाघांचा वावर, ग्रामस्थांत घबराट

 belgaum

कबनाळी (ता. खानापूर) येथील परिसरात वाघाचा वावर सुरू झाला असून या परिसरातील आंबोळी, मुघवडे, नीलावडे, बांडेकरवाडा, या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कबनाळी येथील ग्राम पंचायतीचे माजी चेअरमन राजू धुरी यांनी हे आवाहन केले आहे. खुद्द धुरी यांना कबनाळी (ता. खानापूर) येथील परिसरात वाघाचे दर्शन झाले आहे. रानात संबंधित ठिकाणी मातीत वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. मातीत उमटलेल्या या वाघाच्या पावलांच्या ठशाची छायाचित्रे काढून ती वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहेत.

Tiger
Tiger spoted

यासाठी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनीही संबंधित परिसरातील गावकऱ्यांना सतर्क राहण्याची सूचना करावी, अशी विनंती राजीव धुरी यांनी केली आहे.

दरम्यान, आपल्या भागात वाघाचा वावर असल्याचे समजल्याने कबनाळीसह आसपासच्या गावातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच संबंधित वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणीही केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.