Monday, January 6, 2025

/

…. आणि डोळ्याला डोळे भिडवून वाघ पिऊ लागला शेळीचे रक्त

 belgaum

सकाळच्या कोवळ्या उन्हात भाकर खात बसलेल्या गवळी कुटुंबाच्या डोळ्यादेखत एका धिप्पाड वाघाने त्यांच्या पुढ्यात बांधलेल्या शेळीवर झडप घातली आणि उपस्थितांच्या डोळ्याला डोळे भिडवून वाघ त्या शेळीचे रक्त पिऊ लागला, हा प्रसंग चित्रपटातील नव्हे तर वास्तवातील आहे. नागरगाळी नजीकच्या कोसकोप्प गवळीवाडा येथे सोमवारी सकाळी ही थरारक घटना घडली.
समजलेल्या माहितीनुसार, नागरगाळी नजीकच्या कोसकोप्प गवळीवाडा येथे अडुळकर कुटुंबीय सकाळच्या कोवळ्या उन्हात भाकर खात बसले होते. बायका-मुले पोटाची खळगी भरत होती. त्याचवेळी एक धिप्पाड वाघ अचानक तेथे अवतीर्ण झाला आणि त्याने अडुळकर कुटुंबीयांच्या पुढ्यात गोठ्यात बांधलेल्या शेळीवर झडप घातली. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच वाघाने शेळीच्या गळ्याचा घोट घेऊन रक्त पिण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून काही पावलांवरच बसलेल्या अडुळकर आणि त्यांच्या कुटुंबियांची जीवाच्या भीतीमुळे पाचावरधारण बसली. तथापि तो वाघ मात्र त्यांच्या डोळ्याला डोळे भिडवून शांतपणे शेळिचे रक्त पीत होतो. भानावर येताच अडुळकर आणि आसपासच्या गवळ्यांनी आरडाओरड केल्याने वाघाने मृत शेळीला तेथेच टाकून जंगलात पलायन केले.

Tiger attacks goat
Tiger attacks goat

आता वाघाने दिवसाढवळ्या मनुष्यप्राण्यासमोरच अशा पद्धतीने पाळीव प्राण्यांचा फडशा पाडण्यास सुरुवात केल्याने कोसकोप्प गवळीवाड्यासह नागरगाळी परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

वाघाचे जर अशाप्रकारे हल्ले होत राहिले तर आपण जगायचे कसे? बायका मुलांना कसे सुरक्षित ठेवायचे? असा सवाल वाघाचे हिंस्त्र रूप पाहणाऱ्या अडुळकर यांनी केला आहे. दरम्यान, वनखात्याने आतातरी याची गंभीर दखल घेऊन संबंधित वाघाचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.

पहा तो बकऱ्याला वाघाने खाल्ल्या नंतरचा व्हीडिओ…करा खालील लिंक क्लिक-

वाघाने बकऱ्याला खाल्लं-सकाळच्या कोवळ्या उन्हात भाकर खात बसलेल्या गवळी कुटुंबाच्या डोळ्यादेखत एका धिप्पाड वाघाने…

Posted by Belgaum Live on Tuesday, December 24, 2019

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.