अवजड वाहनाला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने केदनूर येथील तीन तरुण जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे.
रविवारी रात्री उशिरा हा भीषण अपघात घडला आहे.नंदीहळ्ळी येथील भाताच्या मळणीचे काम आटोपून हे तीन तरुण आपल्या गावी केदनूरला परत येत होते.राष्ट्रीय महामार्गावरील बर्डे धाब्याजवळ थांबलेल्या ट्रकला या तरुणांच्या दुचाकीने धडक दिली.
या अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले.संजू राजाई (२९),अडीवेप्पा (२७) आणि गुजण्णवर (३९) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.बेळगाव उत्तर पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.