मालिदा खात असलेल्या जुन्या ऑपरेटर्सची बदली झाल्यानंतर त्या जुन्या ऑपरेटर्सनी राजकीय वजन वापरत पुन्हा कार्यालयात येऊन कामकाज सुरू केले आहे.सात पैकी तीन महिला ऑपरेटर सोमवारी पर्यंत अद्याप कोणताही शासकीय आदेश नसताना रुजू झाल्या आहेत.
उप नोंदणी कार्यालयातील बदली करण्यात आलेल्या तीन महिला ऑपरेटर पुन्हा आपली बदली उप नोंदणी कार्यालयात करून घेण्यात यशस्वी झाल्या आहेत.
खरेदीपत्र चोरीला गेल्याची घटना घडल्या नंतर सगळ्या ऑपरेटरची बदली करण्यात आली होती.एजंट,अधिकारी यांच्याशी संगनमत साधून ऑपरेटरनी आपले वजन तेथे निर्माण केले होते.त्यामुळे खरेदीपत्र चोरीला गेल्यावर ऑपरेटर मधील स्पर्धा आणि राजकारण ,मलिदा यामुळे पुन्हा उप नोंदणी कार्यालयात रुजू होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले होते.पण त्यांची डाळ शिजली नव्हती.अखेर एका मंत्र्याला महिला ऑपरेटरनी साकडे घातले.या मंत्र्यांनी सरळ उप नोंदणी अधिकाऱ्याला फोन करून तीन महिलांना त्वरित रुजू करून घ्या म्हणून फोन केला.रुजू करून घेतला नाही तर बदली होईल म्हणून दम दिल्यावर उप नोंदणी अधिकाऱ्याने मंत्र्यांच्या आदेशाचे पालन केले आहे.
जुन्या ऑपरेटर्स पुन्हा रुजू झाल्याच्या विरोधात सामाजिक संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.