सुधारित नागरिकत्व विधेयकाला विरोध करण्यासाठी बेळगावात मुस्लिम समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चास हिंसक वळण लागले आहे. मोर्चा संपवून परत जातेवेळी अज्ञाताकडून बस कार टँकर ला लक्ष करण्यात आले आहे.
आर टी ओ सर्कल जवळ दुपारी दोन वाजताच्या दरम्यान अज्ञातांनी दोन बस एक कार पेट्रोलची टँकर आणि ए टी एम वर दगडफेक करत काचा फोडल्या.अचानक झालेल्या दगडफेकी मुळे या भागातील दुकाने बंद करण्यात आली होती त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.लागलीच मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
सोशल मीडिया या बाबाबत कोणत्याही अफवा वर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दगडफेकीत वाहनांना झालेलं नुकसान पहा बेळगाव live च्या खालील व्हीडिओत -व्हीडिओ पहाण्यासाठी खालील लिंक क्लिक करा-
https://m.facebook.com/story.php?story_fbid=986229068401353&id=375504746140458