Saturday, April 27, 2024

/

मंगळूरच्या पार्श्वभूमीवर बेळगावात सोशल मीडियावर नजर

 belgaum

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवून संपूर्ण देशात खळबळ माजली असताना गुरुवारी मंगळूर येथे हिंसाचारात दोघांचा बळी गेला आहे. त्यामुळे बेळगावात ह्याची दक्षता घेण्यात आली असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात सोशल मीडियावर कटाक्षाने नजर ठेवण्यात आली असून कोणतेही अफवा किंवा नको ते मेसेज टाकणाऱ्या वर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मंगळूर येथे झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून याची धास्ती आता बेळगाव पोलिसांनी घेतले आहे. बेळगाव येथे मुस्लिम बांधवांनी यासंदर्भात मोर्चा निघाला होता. यावेळी ही दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी संवेदनशील भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रयत्न करणार असून सोशल मीडियावर नजर रोखून ठेवण्यात आली आहे.

Logo social media
Logo social media

बेळगाव शहर व तालुक्यात बुधवार दिनांक 18 डिसेंबर रोजी रात्री नऊ पासून ते 21 डिसेंबर च्या मध्यरात्रीपर्यंत सीआरपीसी कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी दिवसभर पोलिसांची धावपळ सुरू होती. कोणत्याही भागात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून कोणतेही सोशल मीडिया वर मेसेज व्हायरल केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 belgaum

यासंदर्भात जिल्ह्यात विशेष दंडाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बैलहोंगल, गोकाक, हुक्केरी, कागवाड, खानापुर, चिकोडी, रायबाग, रामदुर्ग, अथणी, सौंदत्ती, निपाणी, कित्तूर या भागात या अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडियावर नको ते व्हायरल करून दंगा पसरवण्याचा कट समाजकंटकांकडून रचण्यात येतो. त्यामुळे याची दक्षता घेऊन सोशल मीडियावरही नजर ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.