स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध ठिकाणी एकाच वेळी कामे सुरू असल्यामुळे वाहुतकीची कोंडी होत असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. याकरिता एकाच ठिकाणी काम सुरू करत ते पूर्ण करणे,तसेच इतर सर्व कामे पारदर्शक व दर्जेदार करावीत, अशी मागणी ‘बेळगाव मार्ग’च्या रविवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. अध्यक्ष वकील अशोक पोतदार अध्यक्षस्थानी होते.
या संदर्भात विभाषीय आयुक्त अमलात आदित्य बिस्वास याना भेटून निवेदन देण्याचे या वेळी ठरले.
गल्लो गल्लीतीन रस्त्यांची खड्डे पडून दुर्दशा झाली आहे. अनेक मार्गावरील पथदीप बंद आहे. सार्वजनिक ठिकाणाची अस्वच्छता , वाहनचालकककडून रहदारी नियमांचे होत असलेले उल्लंघन याबाबत ही बैठकीत चर्चा करण्यात आली.
प्रारंभी हैदराबाद येथे पशुचिकित्सक डॉ.प्रियंका रेड्डी या युवतीवर अत्याचार करून जीवन्त जाळण्याची दशतजनक घटना घडली आहे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत दिवंगत युवतीला श्रद्धांजली वाहण्यात अली.
सरचिटणीस कृष्णा शहापुरकर यांनी प्रास्ताविक केले, माजी महापौर ऍड. नागेश सातेरी, डी. बी.पाटील,अजित हिंडलगेकर , आदींनी चर्चेत भाग घेतला.
मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनमध्ये झालेल्या या बैठकीत माजी आमदार परशुराम नंदीहाळी,सदानंद सामंत, शेखर पाटील,सुहास हुद्दार , विकास कलघटगी, काशीनाथ चिगुळकर, शिवराज पाटील,मधु पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.