कोणत्याही देशासाठी शहरे ही विकासाची यंत्रे असतात. आपल्या भारताचे हे नेमके असेच आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 31 टक्के नागरिक शहरात राहतात विशेष म्हणजे देशाच्या जीडीपीमध्ये ही लोकसंख्या 63% भर टाकत असते. वाढत्या शहरीकरणात 40 टक्के लोकांनी शहरीकरणाचा भाग व्हावा आणि 2030 सालापर्यंत जेडीपी मधील त्यांचा वाटा पंच्याहत्तर टक्के असावा असे उद्दिष्ट सरकारने पर्यायाने केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने आखले होते. यासाठी गरज आहे ती सांस्कृतिक आर्थिक आणि सामाजिक विकासाची नागरिकांची जीवनशैली दर्जात्मक व्हावयास हवी तर लोक शहरांमध्ये गुंतवणुकीस आकर्षित व्हायला हवेत असे याचे उद्दिष्ट होते. मात्र हे उद्दिष्ट नागरिकांना माहिती नसली तरी अधिकाऱ्यांना माहिती होते. याचे बट्ट्याबोळ करण्यातच धन्यता मांनण्यात आली आहे. त्यामुळे अनेकातून स्मार्ट सिटी म्हणजे काय रे भाऊ हा सवाल उपस्थित होत आहे.
शहराची स्वतंत्र ओळख निर्माण करून देणे स्मार्ट सिटी मधील सुविधा त्याची धोरणे आणि खर्च करण्यात येणारा निधी या साऱ्यावर केंद्र सरकारने नियोजित बदली त्यात विकास कामांचा आराखडा तयार करून विकासाचे चालना देऊन स्मार्ट सिटी करण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. यासाठी 48 हजार कोटींचा आराखडा आखण्यात आला होता. मात्र येथील अधिकारी लोकप्रतिनिधी आणि छोट्या कंत्राटदारा पासून ते मोठ्या कंतत्राटदारापर्यंत चाललेला भ्रष्टाचार यामुळे स्मार्ट सिटी चा बट्याबोळ झाला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीची कामे नेमके कोणत्या पद्धतीने चालतात हे अजूनही नागरिकांना माहीतच नाही. यापुढे तरी याचा विचार करून स्मार्ट सिटीच्या कामांना चालना द्यावी अशी मागणी होत आहे.
विकास आणि वृद्धीच्या या वाटचालीस स्मार्ट सिटीज हे एक असेच पाऊल आखण्यात आले आहे शहरीकरणात विकासात्मक दृष्टिकोन ठेवून ठरविलेले धोरण अशी या अभियानाचे सध्याची व्याख्या आहे. मात्र या व्याख्या पुसून टाकून नवीनच व्याख्या निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्ट तिचा गाजावाजा करून अनेकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न महागात पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लोकप्रतिनिधींच्या टक्केवारीत स्मार्ट सिटी चा बोजवारा उडाला आहे. त्यामुळेच विकास कामांना चालना देण्यासाठी अनेक कंत्राटदारांना लोकप्रतिनिधींच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. अशा स्मार्ट सिटीचे गांभीर्यच हरून गेले आहे.
अमुक शहराचा स्मार्ट सिटी मध्ये समाज होणार किंवा झाला असे जेव्हा ऐकावयास मिळते तेव्हा स्मार्ट ती म्हणजे नेमके काय? असा प्रश्न सर्वत्रच ऐकावयास मिळतो. स्मार्ट सिटीचा अर्थ विकसित आणि सुंदर असा घेतला आणि संयुक्तरीत्या मराठी मध्ये एक सुंदर विकसित शहर असे म्हटले तर सोप्या शब्दात या संकल्पनेची व्याख्या करता येईल. स्मार्ट सिटीही एक संकल्पना आहे. ती प्रत्येक देशात आणि प्रत्येक शहरात वेगवेगळी ठरू शकते. सध्यातरी बेळगावात आवश्यक आणि अनावश्यक गोष्टी अधिकच घडत असल्याने या स्मार्ट सिटीचा संकल्पनेचा जो हेतू होता तो पुसून गेला आहे. आणि त्या जागी आता राहिले आहे, फक्त भकास शहर भकास शहर आणि भकास शहर… म्हणूनच नागरिक म्हणतात स्मार्ट सिटी म्हणजे काय रे भाऊ…..