12 जानेवारी रोजी खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथे होणाऱ्या गुंफण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस असणार आहेत. कवी संमेलनाच्या अध्यक्षपद सुनंदा शेळके भूषवणार आहेत. या संमेलनाचे उदघाटन गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे करणार आहेत.
खानापूर तालुक्यात होणारे हे संमेलन यापूर्वी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यात भरवलं गेलं, मागील वर्षी कावळेवाडी येथे हे संमेलन भरवले होते. सदर संमेलन गुंफण साहित्य अकादमी व पिसेदेव नागरी को ऑप सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात येत आहे.
चार सत्रात भरणाऱ्या या संमेलनास महाराष्ट्र गोवा आणि सीमावर्ती भागातून अनेक साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. बैल आणि ग्रामीण संस्कृती याविषयावर वकील चंद्रकांत कांबीरे यांचे व्याख्यान होणार आहे.
कवी संमेलनात बेळगावसह महाराष्ट्र व गोव्यातील नामवंत कवी सहभागी होणार आहेत.शुक्रवारी दि 20 रोजी कै शामराव देसाई साहित्य नगरी इडलहोंड येथे मुहूर्तमेढ होणार आहे, असे गुंफण समन्वयक गुणवंत पाटील ,पिसेदेव सोसायटीचे चेअरमन तातोबा पाटील गुरुजी ,माजी आमदार दिगंबर पाटील यांनी कळविले आहे