सुधारित नागरिकत्व कायदा देशाच्या समर्थनात असून त्याविरोधात कोणत्याही संघटनेने आणि कोणत्याही पक्षाने अपप्रचार करू नये यासाठी त्या कायद्याच्या समर्थनात श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्यावतीने जमावबंदी संपताच जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांना मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. यामुळे साऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम सेने(हिं)चे बेळगाव जिल्हा अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.
श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्त कार्यालयावर ऐतिहासिक एनआरसी आणि कॅब कायद्याच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे त्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.सुधारित नागरिकत्व विधेयक या ऐतिहासिक कृतीच्या समर्थनार्थ 24 डिसेंबर रोजी रॅली काढण्यात येणार आहे.
24 डिसेंम्बर रोजी ११ वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौकातून किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, गणपती गल्ली, शनिवार कुठा, कॉलेज रॉड, राणी चन्नम्मा सर्कल फिरत या मोर्चा निघणार आहे. यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
श्री रामसेना (हिं) संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी, केंद्र सरकारने नागरिकत्व कायदा दुरुस्ती व राष्ट्रीय नागरिकत्व कायदा लागू केला आहे तो स्वागतार्ह आहे. तथापि जो पर्यंत याबद्दल माहिती दिली जात नाही त्यांना याबद्दल प्रथम माहित असणे आवश्यक आहे. बेळगावसह देशभरातील रस्त्यांवर याचा निषेध करण्यात येत आहे. मात्र भारतातील कोणत्याही मुसलमानांना या कायद्याचा धोका नाही त्यामुळेच कोणते अफवा पसरू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.यावेळी विनायक पाटील, भरत पाटील, बलवंत शिंदोळकर, श्रीकांत कुऱ्याळकर, राजेंद्र बैल्लुर राहुल बडस्कर आणि परशुराम पाखरे उपस्थित होते.