अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचा मुलींचा हँडबॉल संघ येत्या 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत हरियाणामधील रोहतक येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भाग घेण्यासाठी नुकताच रवाना झाला.
मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे अलीकडेच संपन्न झालेल्या विद्याभारती 32 व्या राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धेत संत मीरा इंग्रजी माध्यमाच्या मुलींच्या हँडबॉल संघाने घवघवीत यश संपादन करून दक्षिण- मध्य विभागात बेळगावसह कर्नाटकाचे नाव उज्ज्वल केले. या कामगिरीची दखल घेऊन सदर संघाची स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया या मध्यप्रदेश मध्ये आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली. तेंव्हा या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संत मीराचा संघ गेल्या 23 डिसेंबर रोजी रोहतक हरियाणा येथे रवाना झाला.
राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी रवाना झालेल्या संत मीरा इंग्रजी माध्यम मुलींच्या हँडबॉल संघात श्वेता मोरे, रश्मी पाटील, जानवी मंडोळकर, भूमी जाधव, रोहिणी माळवी, हर्शिता मदभावी, श्रद्धा पणारी, अक्षता पाटील, त्रिशा नाईक व रचना देसाई या खेळाडूंचा समावेश आहे संघासमोर क्रीडाशिक्षक अरुण जगताप व निता धाकलुचे हे देखील रवाना झाले आहेत.
उपरोक्त संघाला विद्या भारतीचे राज्य अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांच्यासह शिक्षक व पालकवर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे.
________________
(***फोटो देत आहे)