बेळगाव तालुक्यातील अलतगे येथील शेतवडीतील अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्ते आणि पुलाची पूर्ववत निर्मिती करावी, अशा मागणीचे निवेदन बुधवारी एपीएमसीचे अध्यक्ष आनंद पाटील यांना सादर करण्यात आले.
जि. पं. उपाध्यक्ष अरुण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अलतगे येथील शेतकऱ्यांनी सादर केलेले निवेदन स्वीकारून एपीएमसी अध्यक्ष आनंद पाटील यांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मौजे अलतगे येथील शेतवडितील रस्ते व शेतकऱ्यांनी येण्या-जाण्यासाठी निर्माण केलेले पूल यंदा अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहेत.
त्यामुळे आता शेतकऱ्यांना ये-जा करणे अवघड होऊन त्यांची मोठी गैरसोय होत आहे. तेंव्हा या ठिकाणी लवकरात लवकर रस्ते व पुलाची पूर्ववत निर्मिती करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
सदर निवेदनावर अरुण कांबळे यांच्यासह एपीएमसी सदस्य बसवंत मायाणाचे, यललोजी पाटील, माजी एपीएमसी सदस्य शिवाजी राक्षे, ग्रा. पं. सदस्य चेतक कांबळे, चंद्रकांत धुडूम, मोहन पाटील, पुंडलिक पाटील, बाबू चौगुले, राजू पावशे, भरमा हिरोजी, संजय आळोजी, महादेव तळवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान आता गुरुवार दि. 12 डिसेंबर रोजी जि. पं. उपाध्यक्ष अरुण कांबळे आणि जि. पं. सदस्य सरस्वती पाटील यांच्या नेतृत्वाखाली यमकनमर्डी मतदार संघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांना निवेदन सादर केले जाणार आहे.