प्यास फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दलाई लामा यांची मुंदगोड येथे भेट घेऊन त्यांना प्यासच्या कार्याची माहिती दिली.प्यासच्या कार्याची सगळी माहिती दलाई लामानी अत्यंत आपुलकीने जाणून घेतली.प्रकल्प करताना कोणत्या अडचणी येतात,कशा पद्धतीने अडचणींवर मात केली जाते,प्यासचे भविष्यात कोणते प्रकल्प आहेत हे सगळे दलाई लामानी विस्ताराने जाणून घेतले.
प्यास फाऊंडेशन करत असलेले कार्य मोलाचे आहे.चांगले कार्य यशस्वी होतेच.आज प्यास फाऊंडेशन सारख्या संघटनांची आवश्यकता आहे.पाण्याचे महत्व जाणून घेऊन प्यास करत असलेले कार्य कौतुकास्पद असून तुमचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे.भविष्यातील प्यासच्या कार्याला शुभेच्छा अशा शब्दात दलाई लामा यांनी प्यासच्या कार्यकर्त्यांशी बोलताना मनोगत व्यक्त केले.
दलाई लामा यांची सगळ्या प्रति असलेली आपुलकीची भावना, त्यांचा साधेपणा आणि त्यांचे विविध विषयाचे ज्ञान पाहून प्यासचे कार्यकर्ते भारावून गेले अशा शब्दात प्यासचे अध्यक्ष माधव प्रभू यांनी भेटी नंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.यावेळी त्यांच्या समवेत अभिमन्यू डागा, सूर्यकांत हिंडलगेकर,विजय भागवत आणि माजी नगरसेविका लालन प्रभू उपस्थित होते.