पब्जीमुळे काकती येथे नुकतीच दोन महिन्यापूर्वी एका पोलिस अधिकार्याचा मुलानेच खून केला होता. ही घटना ताजी असतानाच याला आळा घालण्यासाठी काकती येथील नागरिकांनी पब्जीची प्रतिकृती तयार करून ओल्डमनच्या स्वरुपात यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्याचा निर्धार ठरविला आहे. या ओल्डमनमुळे साऱ्यांचेच लक्ष वेधून घेण्यात येत असले तरी तिच्या नादी लागू नका असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.
पब्जीमुळे अनेक तरुण गुरफटलेले असतानाच काही ठिकाणी पब्जीचा छंद अनेक तरुणांना नादी लावण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या पब्जी विरोधात आता अनेकांनी त्यांच्या प्रतिकृती साकारून त्याच्यावर आज रात्री अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले आहे.
पब्जीच्या व्यापामुळे संतापलेल्या नागरिकांनी आता ओल्ड मॅन करून त्याची प्रतिकृती दहन करण्याचा निर्धार केला आहे. काकती येथील चनमा सर्कल येथील पुतळ्याजवळ अशीच पब्जीची प्रतिकृती उभे करून त्याचे दहन करून नवीन वर्षात नवीन स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे पब्जीचा विळखा नवीन वर्षात सुटणार अशी आशा साऱ्यांना लागून आहे.
भल्याभल्यांना पाणी पाजण्यासाठी पब्जी ने नाहक त्रास केले आहे. त्यामुळे पब्जी नको रे बाबा म्हणण्याची वेळ अनेकांवर आली होती. या पब्जीमुळे काकती येथेच एका पोलिस अधिकार्याचा मुलानेच फोन केला होता. त्यामुळे पब्जीचा विचार करून काकती येथे ओल्ड मॅन ची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ती आज मध्यरात्री 12 वाजता दहन करून या पब्जी च्या वेढ्यातून सोडवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.