अंगणवाडी कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.सिटू या कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता.वेतनात वाढ करावी,पदोन्नती मिळावी आणि अन्य सवलती मिळाव्यात अशी मागणी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी केली आहे.
सरकार अंगणवाडी कामा बरोबरच अन्य कामेही अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या कडून करवून घेत आहे.सरकारी योजनेसाठी देखील अंगणवाडी कार्यकर्त्यांना कामाला लावले जाते.अंगणवाडी कार्यकर्त्यांना किमान वेतन श्रेणी लागू व्हावी आणि अन्य सवलती मिळाव्यात असे निवेदन अंगणवाडी कार्यकर्त्यांनी दिले.
केंद्र सरकारने अलीकडेच आणलेला कायदा चुकीचा आहे.त्याचा फटका अंगणवाड्याना बसणार आहे.त्यामुळे हा कायदा रद्द करावा.सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यात सहा ठिकाणी मोर्चे काढण्यात आले आहेत.दहा डिसेंम्बर रोजी टूमकूर ते बंगलोर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे अंगणवाडी संघटनेचे अध्यक्ष जैनेखान यांनी सांगितले.