घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लावण्यात आलेला बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्यामुळे आंबेडकर यांचा अवमान करण्यात आला आहे.
बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकाचा पोलिसांनी शोध घ्यावा.त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विविध दलित संघटनांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
दि.12 डिसेंम्बरच्या रात्री लावण्यात आलेला बॅनर समाजकंटकांनी फाडला आहे.त्यामुळे बाबासाहेबांचा अवमान झाला आहे.बस स्टँड जवळ सदर बॅनर लावण्यात आला होता.
बॅनर फाडणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी दलित संघटनांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.मल्लेश चौगुले,के डी मंत्रेशी आदी दलित नेते याप्रसंगी उपस्थित होते.