पेजावर मठाधिश विश्वेश्वर तीर्थ यांच्या महानिर्वाणामुळे संपूर्ण कर्नाटकवर शोककळा पसरली आहे.बेळगावमध्ये देखील त्यांच्या भक्तांची संख्या लक्षणीय असून येथील श्री कृष्ण मठात त्यांना भक्तांनी श्रद्धांजली अर्पण केली.स्वामीजींचे बेळगावशी निकटचे संबंध होते.
संमेलन ,सप्ताह आदी निमित्ताने त्यांचे नेहमी बेळगावला येणे व्हायचे.अनेक विषयांवर त्यांनी आपली वेळोवेळी परखड मते व्यक्त केली होती.हिंदुत्वाचे ते कट्टर पाठीराखे होते पण अन्य धर्माचा त्यांनी कधी दुस्वास केला नाही.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संमेलनात त्यांनी सहभागी होऊन आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने छाप पाडली होती.समाजाविषयी आणि गरिबविषयी कळवळा असणाऱ्या व्यक्तिमत्वाचे महानिर्वाण झाले आहे.त्यांचे पार्थिव बंगलोर येथील नॅशनल लॉ कॉलेज मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.