न्यायालय आवारात वारंवार पार्किंगची समस्या डोकेदुखी ठरू लागले आहे. त्यामुळे पक्षकार आणि वकिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याचा विचार करून न्यायालय आवारात मार्किंग करून पार्किंगची समस्या मिटविले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
न्यायालयामध्ये पार्किंग सुरळीत करण्यासाठी नुकतीच मार्किंग करण्यात आली होती. त्यानुसार आता वाहन चालक पार्किंग केलेल्या जागेत आपली वाहने पार्किंग करत आहेत. मात्र सध्या तरी हा श्री गणेशा सुरू असला तरी काही दिवसात पुन्हा येरे माझ्या मागल्या होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्यातरी पक्षकाराने वकिलाकडून समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी यापुढेही असेच पार्किंगची व्यवस्था ठेवावी अशी मागणी होत आहे.
पार्किंगच्या समस्येमुळे वकील बरोबरच कर्मचारी आणि पक्षकार आतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होते. पार्किंग समस्या सोडविण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढविण्यात आल्या. मात्र त्या योग्य प्रकारे हाताळण्यात न आल्याने पुन्हा पार्किंगची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे आता मार्किंग करून पार्किंग व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी न्यायालय परिसरात चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठी अडचण झाली होती. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी वकिलांनी वारंवार मागणी केली होती. त्यानुसार चार दिवसांपूर्वीच न्यायालय परिसरात चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी मार्केटिंग करण्यात आले. त्यानुसार आता पार्किंग करण्यात येत असून मार्किंग केलेल्या ठिकाणी पार्किंग करावे अशी मागणी सध्या होत आहे. मात्र सध्या तरी सृष्टीत पार्किंग करण्यात येत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.