Tuesday, January 14, 2025

/

या रुग्णाला मिळतेय मदत…

 belgaum

बेळगावच्या वेणुग्राम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या औदुंबर तेंडुलकर या हलाखीची परिस्थिती असलेल्या रुग्णाला उपचारासाठी अद्यापपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून 63231 रुपयांची मदत मिळाली असली तरी अद्यापही त्याला मदतीची गरज आहे.

तेंव्हा दानशूर व्यक्तींसह सेवाभावी संस्थांनी त्याला आर्थिक मदत करावी, असे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहे.
मुंबई येथे गेल्या 1 ऑगस्ट रोजी अपघातात गंभीर जखमी झालेल्या औदुंबर चंद्रकांत तेंडुलकर (वय 31) या रुग्णावर गेल्या 12 सप्टेंबरपासून बेळगावच्या वेणुग्राम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

रोहिणी तेंडुलकर यांचा औदुंबर हा एकुलता एक मुलगा असून त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. इतर कोणी नातेवाईक नसल्यामुळे रोहिणी यांना 24 तास अंथरूणाला खिळून असलेल्या मुलाच्या देखभालीसाठी हॉस्पिटलमध्ये थांबावे लागते. तेंव्हा मदत मिळविण्यासाठी त्या बाहेर फिरूही शकत नाहीत. हॉस्पिटलमधील मुलाचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी स्वतःचे घर देखील विकले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून औदुंबर याच्या उपचारासाठी आतापर्यंत 63231 रुपयांची मदत मिळाली आहे.

मात्र अद्यापही बराच खर्च येणार आहे.
तरी दानशूर व्यक्तींसह सेवाभावी संस्थांनी औदुंबरच्या उपचाराच्या खर्चासाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मदतीसाठी बँक खात्याचा क्रमांक पुढील प्रमाणे आहे. A/c no:10226856664, ifsc: sbin0002217, bank: state bank of India, branch: industrial estate, udymbag. संपर्क क्र.: 7026723434.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.