घरची अत्यंत हालाखीची परिस्थिती आणि जन्मापासूनच अपंगत्व आलेल्या प्रीती अनंत तम्मानाचे या मुलीसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
फुलबाग गल्ली क्रॉस नंबर 2 (शनि मंदिरानजीक) येथील अनंत तम्मानाचे यांची 20 वर्षीय मुलगी प्रीती उर्फ बंटी हिला जन्मापासून अपंगत्व आलेले आहे. तिचे दोन्ही हात व पाय काम करत नसल्यामुळे तिला उभे राहता येत नाही. प्रितीची आई गृहिणी असून वडील अनंत तम्मानाचे हे कंग्राळी मार्केट यार्डमध्ये हमाली करतात. त्यामुळे त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची आहे.
हमाली करून आपला संसार कसाबसा रेटणाऱ्या अनंत तम्मानाचे यांना आपल्या वयात आलेल्या अपंग मुलीची देखभाल करण्याबरोबरच तिचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आर्थिक मदतीची गरज आहे. तरी दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी सर्वतोपरी मदत करावी, अशी विनंती वजा- आवाहन प्रीतीचे काका सदानंद तम्मानाचे यांनी केले आहे. यासाठी इच्छुकांनी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा- 9880853945 (आई), 7795220336 (काका सदानंद तम्मानाचे).