सुधारित नागरिक कायद्याविरोधात देशभरातच आगडोंब उसळला आहे. अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागले आहे अश्यात
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केलेल्या धक्कादायक विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पत्रकारांनी देशभरात सुरू असलेल्या सुधारित नागरिक कायदा विरोधातील आंदोलनासंदर्भात अंगडी यांना छेडले असता त्यांनी आंदोलनाच्या नावावर सामाजिक शांतता भंग करणारे,सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणार्यांना गोळ्या घालण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने द्यायला हवेत असे वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे.
सुरेश अंगडी यांच्या विधानावरून राजकीय पटलावर नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील आंदोलनांना जालियनवाला बाग अशी तुलना केली होती त्यातच अंगडी यांनी गोळ्या घाला अस वक्तव्य करून गोंधळ उडवला आहे.गोळ्या घाला म्हणणारे जनरल डायर आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे.