प्रत्येक वेळी दोन्ही राज्यांच्या राज्यपालांच्या अभिभाषणात सीमा प्रश्नाचा मुद्दा घेतला जातोच. मात्र बेळगाव बाहेरील कन्नड संघटनेच्या नेत्यांकडून बेळगावात येऊन वादग्रस्त वक्तव्ये केली जातात.मराठी भाषिक गेल्या 64 वर्षा पासून लोकशाही मार्गातून लढा देत आहेत. मात्र कनसेच्या भीमा शंकर यांनी समिती नेत्यांना गोळ्या घाला, असे वादग्रस्त वक्तव्य करून बेळगावसह दोन्ही राज्यातील शांतता बिघडवली आहे. अश्या कन्नड संघटनेच्या नेत्यांना आवरा भीमा शंकर याच्यावर कारवाई करा, अशी मागणी मराठी नेत्यांनी पोलिसांकडे केली आहे.
मंगळवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समिती शिवसेनेच्या नेत्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्या बैठकीत मराठी नेत्यांनी बेळगाव बाहेरून आलेल्या कन्नड नेत्यांना आवरा कारवाई करा अन्यथा मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला जाईल अशी मागणी केली. बैठकीत पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, डी सी पी सीमा लाटकर आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
बेळगावातील स्थानिका ऐवजी बाहेरून आलेले कन्नड संघटनांचे नेते हा वाद पेटवत आहेत.मराठी भाषिकांनी असे वक्तव्य केले असते तर पोलीस गप्प बसले असते का?पोलिसांनी पक्षपातीपणा करू नये अशी देखील मागणी करण्यात आली. त्यावर पोलिसांनी भीमा शंकर यांच्या वक्तव्याचा तपास सुरू असल्याचे सांगितले.
सध्या सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे कन्नड किंवा मराठी भाषिकांनी कायदा हातात घेऊ नये. मराठी नेत्यांनी युवकांना समजावून सांगावं जर कुणी कायदा हातात घेत असेल तर कारवाई करू अश्या सूचना दिल्या.बैठकीत दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, मनोहर किणेकर, सरस्वती पाटील, अरविंद नागनूरी, नेताजी जाधव आदींनी विचार मांडले.