मागील काही वर्षांपासून कंत्राटदारांच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कंत्राटदारांनी एक संघटना स्थापन केली आहे. त्यांच्या माध्यमातून कंत्राटदारांना न्याय मिळेल अशी आशा साऱ्यांना लागून राहिली आहे. त्यामुळेच आता कंत्रातदार तर विविध अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या समस्या आणि गाराने मांडताहेत. तालुका पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची ही भेट घेण्यात आली. यावेळी त्यांनी कंत्राटदारांना धीर दिला असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
बेळगाव तालुका सहकारी नोंदणी आणि सिव्हिल कंत्राटदार वेल्फेअर असोसिएशनच्या संघटनेने नुकती तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लीकार्जुन कलादगी यांची भेट घेऊन त्यांना समस्या संदर्भात निवेदन दिले आहे. यावेळी समस्या सोडवू आणि लवकरच कंत्राटदार आणि तालुका पंचायतीच्या यांची बैठक घेऊ असे आश्वासन दिल्यामुळे तंत्रज्ञानातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मागील दोन ते तीन वर्षापासून उद्योग खात्री योजनेतील बिले आणि तसेच 14 वा वित्त आयोगातून केलेल्या कामाची रक्कम कंत्राटदारांना मिळालेली नाही. याचा विचार करून त्यांनी कलादगी यांची भेट घेतली. यावेळी संबंधित चौकशी करून तातडीने दिले काढून देऊ असे आश्वासन दिले. याचबरोबर तुमच्या नुकतीच स्थापन झालेल्या संघटनेला शुभेच्छाही दिल्या.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत थोरवत, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सदस्य रामकृष्ण पाटील, धाकलू चिक्के, महादेव पाटील, नारायण अगसगेकर, विजय टिप्पनाचे, महावीर पाटील, सुरेश मयेकर, रमेश कडोलकर आदी यावेळी उपस्थित होते.