Tuesday, January 7, 2025

/

काजोल नेसणार बेळगावची साडी!

 belgaum

चित्रपट व मालिकांमध्ये अलिकडे सातत्याने बेळगावचे नाव झळकत असते. आता बॉलिवूडची एक ख्यात अभिनेत्री बेळगावची शहापुरी साडी एका खास भूमिकेसाठी परिधान करणार आहे ही विशेष बाब होय.

तानाजी : द अनसंग वॉरियर या चित्रपटात अभिनेत्री काजोलची महत्त्वाची भूमिका असून ती तानाजी मालुसरे यांच्या पत्नीच्या भूमिकेत चमकणार आहे. बेळगाव शहरातील वडगाव- खासबाग भागातील पॉलिएस्टर साड्या या शहापुरी साड्या म्हणून सुप्रसिद्ध आहेत.

साड्यांचा एक नामांकित ब्रँड म्हणून शहापुरी साड्या देशाच्या विविध भागात निर्यात होतात. आता या साड्या बॉलीवुडची अभिनेत्री काजोलच्या आगामी तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटातील भूमिकेच्या अनुषंगाने प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. 17व्या शतकातील मराठ्यांचे सरसेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित तानाजी द अनसंग वॉरियर हा बिग बजेट चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

Kajol
Kajol

या चित्रपटाचे ट्रेलर गेल्या 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेला भव्य हा चित्रपट विविध नाट्यमय व रोमहर्षक प्रसंगानी खच्चून भरला आहे. अभिनेता अजय देवगण, सैफ अली खान व काजोल हे या चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारत आहेत. अन्य ऐतिहासिक चित्रपटांप्रमाणे तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट आपल्याला इतिहासात खोलवर घेऊन जातो. सतराव्या शतकातील मराठ्यांचे सरसेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग उलगडून दाखवतो. नरवीर तानाजी मालुसरे यांची भूमिका अजय देवगन यांनी साकारली आहे हे पात्र अत्यंत प्रभावी आणि जिवंत वाटावे यासाठी चित्रपटात समयोचित भव्य सेट्स आणि वेशभूषा वापरण्यात आली आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी दिलेले आव्हान स्वीकारून अनुभवी डिझाईनर नचिकेत बर्वे यांनी चित्रपटातील पात्रांसाठी तत्कालीन हुबेहूब वस्त्रप्रावरणे तयार केली आहेत.

अभिनेत्री काजोल या चित्रपटात तानाजी यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या पात्रासाठी नचिकेत बर्वे यांना सतराव्या शतकातील मराठमोळी अशी साधी पण उठावदार साडी हवी होती जी त्यांना बेळगावातून शहापुरी साडीच्या स्वरूपात मिळाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.