कडोली बलात्कार प्रकरणी पीडित अल्पवयीन बालिकेच्या अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या,गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच पीडितेच्या आई वडिलांना धमकी देणाऱ्या आरोपीच्या आई वडिलांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ए पी एम सी पोलीस स्थानकात हा गुन्हा नोंद झाला असून आरोपीची आई शांता बाळू बाळनाईक वय 48 यांना अटक करण्यात आली आहे.
कडोली येथील सहा वर्षीय अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या सुनील या नराधामास या अगोदरच गजाआड करण्यात आले आहे.आरोपीच्या आई वडीला कडून प्रकरण दाबून टाकण्यासाठी पीडित मुलीला ए पी एम सी पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी शांता बाळनाईक व बाळू बाळनाईक यांनी पीडितेच्या गळा गोठून मारण्याचा प्रयत्न झाला होता या शिवाय आई वडिलांना देखील धमकी देण्यात आली होती.या सर्वांची गंभीर दखल घेत पोलिसांनी अपहरण खुनाचा प्रयत्न करणे आदी गुन्हे नोंद केले आहेत.आरोपीची आई शांता यांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
रविवारी महिला बाल कल्याण मंत्री शशिकला जोलले यांनी कडोलीला भेट देत पोलिसांना तपास निःपक्षपाती पणे करण्याचे आदेश बजावले होते त्या अगोदर कडोली ग्रामस्थ व विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले होते.