कडोली येथे नराधमाने केलेल्या कृत्याबाबत शुक्रवारी कडोली बंदची हाक देण्यात आली होती. याला कडोलीकरांनी साथ दिली असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी गावकरी एकवटत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. या कृत्यामुळे अनेकांतून संताप व्यक्त होत असून नाराजीही ही व्यक्त होत आहे
.
कडोली येथील एका सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून क्रौर्य करणाऱ्या नराधमाला विरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून त्याला फाशी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. सुनील बाळू बाळू नाईक वय 26 राहणार कडोली असे त्या नराधमाचे नाव असून तो व्यवसायाने टेम्पोचालक आहे. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर एकच हलकल्लोळ माजला आणि गाव एकवटून त्याचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात काकती पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची रवानगी आता हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. त्याच्यावर भादवी 376 व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून नराधमाच्या विरोधात विविध ठिकाणी बैठक या सुरू होत्या. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असली तरी नराधमाला विरोधात मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी त्या नराधमाला आपल्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गावकरी एकटे आहेत.